ओटवणे प्रतिनिधी
पारपोली येथे गवंडी काम करणारा परप्रांतीय कामगार विनोद महातो (४२) हा गुरुवारी ५ ऑक्टोबरपासून बेपत्ता आहे. याबाबत आंबोली पोलीस स्थानकात ठेकेदार बाबू धुरी यांनी तक्रार दाखल केली आहे.विनोद महातो हा पश्चिम बंगाल राज्यातील पुरुलिया जिल्ह्यातील अरीता या गावचा आहे. वेंगुर्ले येथे येथील ठेकेदार बाबू धुरी यांच्याकडे तो दोन महिन्यांपासून गवंडी म्हणून कामाला आहे. पारपोली येथे काम सुरू असताना गुरुवारी सायंकाळी ३ च्या सुमारास विनोद महातो दुकानावर जातो असे सांगून गेला तो पुन्हा कामावर आलाच नाही. परिसरात शोधाशोध करूनही तो सापडला नाही. त्याची उंची साडेपाच फूट असून अंगात मळकट पांढरा फुल शर्ट आणि काळी हा पॅन्ट आहे. याबाबत बाबू धुरी यांनी आंबोली पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. तो कुणाला आढळल्यास बाबू धुरी 9404854417 संदेश गुरव 9420926625, श्री आईर 9819429463 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.









