सांगली
सांगली मध्ये रखरखत्या उन्हात रक्ताच्या उलट्या होऊन परप्रांतीयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगलीमध्ये आईस्क्रीम गोळा विकणाऱ्या एका परप्रांतीया सोबत ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात संबंधित व्यक्तीचा खून झाल्याची अफवा पसरली होती. परंतु हा खून नसून आईस्क्रिमचा गोळा विकणाऱ्या परप्रांतीयाचा आकस्मित मृत्यू झाल्याचे समोर आले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून घटनास्थळी तात्काळ पोलीसांनी धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.









