Jayakumar Gore : कोरेगावच्या नांदवळ, सोळशी भागात रामराजेंच्याकडून एमआयडीसी नेण्याचा घाट घातला जात आहे. तेथील नागरिकांचा त्याला विरोध आहे. रामराजेंचे वय झाले आहे. वयोमानाप्रमाणे त्यांची बुद्धी काम करत नाही. खूप माल कमवाला आहे. आता या वयात जास्त मेंदूला त्रास घेत जावू नका. नातवंडे आहेत का नाहीत मला माहिती नाही. परंतु नातवंडे खेळवायचे वय आहे, अशी टीप्पणी करत आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर केली. यावेळी त्यांनी कोरेगावातल्या शेतकऱ्यांची जमीन जावु देणार नाही आणि म्हसवडातील एमआयडीसी कुठेही जावू देणार नाही, हिंमत असेल तर तुम्ही करुन दाखवा, असा इशारा दिला.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार जयकुमार गोरे म्हणाले, गेल्या दीड महिन्यापासून म्हसवड एमआयडीसीचा विषय गाजतो आहे. पुणे – बंगलोर कॉरिडॉरला माण तालुक्यात मान्यता मिळाली आहे. म्हसवड येथे एमआयडीसी होणार आहे. असे असताना काही लोकांनी कोरेगाव तालुक्यातील नांदवळ भागत एमआयडीसी नेण्याचा घाट घातला आहे. या जिह्यातील महान नेते रामराजे यांचा हा डाव आहे. कारण त्यांच्या फंटरांनी तेथील जमीनी कवडीमोल भावांनी घेतल्या आहेत. त्यातून पाच पन्नास पटीने विक्री करुन त्यातून पैसा छापण्याचा कट आहे. त्यामुळेच म्हसवडच्या एमआयडीसीच्या अनुषंगाने झालेल्या केंद्राच्या समितीला तात्कालिन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यांनी चुकीची माहिती दिली गेली.
माण तालुक्यात पाणी नाही. माण तालुक्क्यत रस्ते नाहीत. त्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोव्हिडच्या नावाखाली कोट्यावधी माया लुटली. त्यांनी चुकीचा रिपोर्ट कोणाच्या सांगण्यावरुन दिला. पाण्याची सोय नाही म्हणताहेत मतदार संघात दोन दोन कारखाने उभे राहत आहेत. त्यामुळे तात्कालिन जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि खास करून रामराजेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
केंद्र सरकारच्या कमिटीला चुकीची माहिती दिल्याची बाब केंद्रीय उद्योग मंत्री सोम प्रकाश यांनी पुण्यात बैठकीवेळी निदर्शनास आणली. तेही आश्चर्यचकित झाले. रामराजेंनी म्हसवडची एमआयडीसी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला. बैठक घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यांना तेथील स्थानिकांना रोजगार द्यायचा नाही तर त्या जमीनीवर पैसे कमवायचे आहेत. केसुर्डीत कोणी जमीनी खरेदी केल्या, कमिन्समध्ये कोणी जमिनी खरेदी केल्या, हे सर्व जनतेला ज्ञात आहे. स्वतःला राजे म्हणता रयतेसाठी काहीतरी करा, असाही टोला त्यांनी लगावला.
ते कधीही यशस्वी होणार नाहीत
जेव्हा जेव्हा माझ्या तालुक्याबाबत आणि माझ्याबाबत षडयंत्र रचले तेव्हा तेव्हा ते त्यात कधीही यशस्वी झाले नाहीत. माझं त्यांना सांगणे जेव्हा फार्मात सचिन तेंडूलकरही असताना रिटायर झाला होता. तुमचेही वय झाले आहे. तुम्हीही व्हा. पवारसोहबांच्यामुळे पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती होता. पवार सोहबांशी दोन दिवसात बेईमानी करता. या माणसाने एवढी गॅरंटी कशी की मध्यंतरी तेच बोलले की भाजपात नाही आले की घरी जावे लागेल किंवा जेलमध्ये जायला लागेल, अशीही रामराजेंच्यावर टीप्पणी केली.
पवारसाहेबांनी तरी नांदवळकरांना भूमीहिन करु नये
ज्यांची जमीन जाते. त्यांच्या वेदना तुम्हाला काय माहिती आहेत. असली कारस्थान कशाला करता, अशा शब्दात रामराज्यांना फटकारत जयकुमार गोरे म्हणाले, नांदवळ हे पवारसाहेबांचे गाव आहे. या गावाला तरी भूमीहिन करण्याच कारस्थान पवारसाहेबांनी करु नये, अशी विनंती त्यांनी नेली.
ग्रामस्थांसाठी बैठक व्यवस्था बदलली
आलेल्या ग्रामस्थांची सख्या मोठी होती. त्याच अनुषंगाने आमदार जयकुमार गोरे यांनीच पत्रकार परिषदेसाठी स्वतःची मोठी खुर्ची सोडून छोटय़ा खुर्चीत येवून बसले. ग्रामस्थांसाठी त्यांनी बैठक व्यवस्था बदलली. अगदी ग्रामस्थ माझे ओळखीचे नाहीत. मी बोलवले नाही त्यांना असेही त्यांनी निक्षून सांगत त्यांनी जे कोरेगावच्या एमआयडीसी समर्थनार्थ पुढे येतील त्यांनी आपला सातबारा दाखवावा, असे आवाहन त्यांनी केले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









