शिक्षण खात्याचा विचार : पटसंख्या वाढीसाठी उपाययोजना
बेंगळूर : राज्यातील सरकारी व अनुदानित प्राथमिक-माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहाराची व्यवस्था करण्यात येते. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. आता सरकारने एक पाऊल पुढे जाऊन पदवीपूर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाहा मध्यान्ह आहार पुरविण्याचा विचार चालविला आहे. 14 नोव्हेंबर रोजी बालदिनी या कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. शिक्षण खात्याने पदवीपूर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अनुकूलतेसाठी मध्यान्ह आहाराची सुविधा देण्याचा विचार चालविला आहे. राज्यात खासगी महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याने सरकारी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे पटसंख्या वाढीसाठी पदवीपूर्व विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देण्याची योजना कार्यरुपात येणे शक्य आहे का, याचा आढवा घेण्यात येत आहे.









