फोनची किमत 8499 पासून सुरु : विविध सुविधांनीयुक्त फोन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मायक्रोमॅक्स इन 2 सी फोन भारतात मंगळवारी सादर करण्यात आला आहे. नवीन मायक्रोमॅक्स फोन मागील वर्षात सादर करण्यात आला होता. इन 2बी या मॉडेलसारखाच या फोनचा नक्षा असल्याचे दिसून येते. फोनला वॉटरड्रॉप-स्टाईल डिस्प्लेसोबत नॉच मिळणार असून यामध्ये डबल रियर कॅमेराही मिळणार आहे.
मायक्रोमॅक्स इन 2 सी ऑक्टाकोर युनिसोक टी 610 एसओसी सोबत इनबिल्ट स्टोरेजसह मायक्रोएसडी कार्ड स्लॉटही मिळणार आहे. फोनला 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी असून यासोबतच ती तब्बल 16 तासांपर्यंत व्हिडीओ स्ट्रीमिंग म्हणजे एका चार्जवर साधारण 50 तासांपर्यंत टॉकटाईम देऊ शकते.
मायक्रोमॅक्स इन 2 सीची किमत
भारतामध्ये मायक्रोमॅक्स इन 2 सी या मॉडेलची किमत ही 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेजसह 8,499 रुपये राहणार आहे. तर सुरूवातीला खास सवलतीत याची खरेदी ही 7,499 रुपयात करता येणार असल्याचे संकेत आहेत. फ्लिपकार्ट व मायक्रोमॅक्सच्या साईटवर 1 मे पासून फोन खरेदी करता येईल.









