सावंतवाडी प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी. कोलगावचे मायकल डिसोजा यांची निवड करण्यात आली आहे. श्री डिसोजा हे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते . त्यांच्यावर सध्या सावंतवाडी तालुका संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. सर्वसामान्य कुटुंबातील असलेले डिसोजा यांच्याकडे संघटना बांधणी कौशल्य चांगले आहे. त्यांचे वडील फ्रान्सिस डिसोजा. हे जनता दलाचे जिल्हाध्यक्ष होते . त्यांनी समाजकारण ,राजकारण सहकारात चांगले काम केले होते. त्यानंतर आता मायकल डिसोजा हे ठाकरे शिवसेनेत कार्यरत आहेत. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात मायकल डिसोझा यांनी भाजपचे नेते महेश सारंग यांचा पराभव केला होता . शिवसेना वाढीच्या दृष्टीने त्यांचे अथक प्रयत्न आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.









