Michael D’Souza as Sawantwadi Taluka Organizer of Thackeray Group, Chandrakant Kasar as Upazila Pramukh.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सावंतवाडी तालुका संघटकपदी कोलगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांची तर उपजिल्हाप्रमुख म्हणून सावंतवाडीचे माजी उपसभापती चंद्रकांत कासार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी ही निवड जाहीर केली आहे. मायकल डिसोजा यांचा लोकसंपर्क दांडगा असुन युवकांचे मोठे पाठबळ त्यांच्याकडे आहे. त्यांचे वडील कै. फ्रान्सिस डिसोजा यांचेही कोलगावात मोठे कार्य आहे. चंद्रकांत कासारही अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. या दोघांचेही शिवसेनेत संघटना वाढवण्यात मोठे योगदान असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.









