Mhapsekar should stop his blatant defamation – Rajendra Nimbalkar
आपण जे काही बोललो ते प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली – भेडशीच्या इमारत कामाच्या दर्जा संदर्भात होते. सदर इमारतीचे ठेकेदार हे म्हापसेकर नाहीत. त्यामुळे त्यांनी सदर टीका वैयक्तिक पातळीवर घेऊ नयेत आणि आपली नाहक बदनामी करू नये असे प्रत्युत्तर शिवसेना ( शिंदे गट ) उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी दिले आहे.म्हापसेकर यांनी आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिवसेनेच्या निंबाळकर, गणेशप्रसाद गवस व गोपाळ गवस यांच्यावर केलेल्या आरोपा विरोधात गुरवारी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. यावेळी शैलेश दळवी, भगवान गवस व रामदास मेस्त्री उपस्थित होते.
श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, आमची दोन दिवसांपूर्वीची प्रेस ही केवळ राजकीय आणि समाजाशी निगडित असलेल्या साटली – भेडशी आरोग्य केंद्र इमारत उद्घाटन विषयावर होती, मात्र म्हापसेकर यांनी ती वैयक्तिक पातळीवर घेत मर्यादा सोडून वैयक्तिक पातळीवर टीका केली. वास्तविक म्हापसेकर यांनी बोलताना मर्यादा पाळून बोलण आवश्यक असताना तस न करता म्हापसेकर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली. शिवाय मी अनेक पक्षात गेलो असे म्हापसेकर म्हणत आहे. मात्र मी ज्या पक्षात असतो तिथे शंभर टक्के निस्वार्थी भावनेतून काम करतो ज्यावेळी माझे विचार पटत नाहीत त्यावेळी मी त्या पक्षातून माझ्या सोबतच्या साथीदारांसह बाहेर पडतो.यावेळी गणेशप्रसाद गवस यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केलेल्या आरोपांच खंडन करत म्हापसेकर यांनी बेछूट आरोप करण्यापेक्षा आपण आत्मपरीक्षण कराव व मग आमच्या नेत्यांवर व आमच्यावर आरोप करावेत असा इशारा दिला आहे. तसेच दीपक केसरकर यांनी कधीही कुठच्याही ठेकेदारांना काम देण्याबाबत कुठच्याही कार्यालयाकडे हस्तक्षेप केला नाही. उलट केसरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोठे केले नाही असाच आरोप आजवर त्यांनी पक्षांतील कार्यकर्त्यानी सहन केला आहे. त्यामुळे आपली बाजू सावरण्यासाठी मंत्री केसरकर यांना म्हापसेकर यांनी नाहक बदनाम करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण कराव असेही श्री. गवस म्हणाले. शिवाय तालुकासंघटक गोपाळ गवस यांनीही म्हापसेकर यांच्या आरोपांचे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दोडामार्ग – वार्ताहर









