गावसवाडा म्हापसा येथील युवकास अटक
म्हापसा : ग्राहकाला अमलीपदार्थ पुरविण्यासाठी आलेल्या संशयित आरोपी गोविंद जाधव (26, रा. गावसवाडा म्हापसा) याला म्हापसा पोलिसांनी सापळा रचून रविवारी अटक केली. संशयिताकडून पोलिसांनी 50 हजार किमतीचा 500 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सीताकांत नायक यांच्या नेतृत्वाखाली व उपअधिक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलीस उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट जॉरम चर्च पार्किंग ठिकाणी एक इसम अमलीपदार्थ घेऊन येणार असा सुगावा म्हापसा पोलिसांना लागला असता उपनिरीक्षक दिनेश कुमार मुखिया, उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर व उपनिरीक्षक विराज कोरगांवकर, हवालदार सुशांत चोपडेकर, शिपाई अक्षय पाटील, आनंद राठोड, अनिकेत कळंगुटकर यांनी सापळा रचला. संशयित गोविंद जाधव तेथे अमलीपदाथ घेऊन आला असता म्हापसा पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले. त्याकडे 500 ग्रॅम गांजा सापडला. याबाबत रितसर पंचनामा कऊन म्हापसा पोलिसांनी संशयितास अटक केली. उपनिरीक्षक बाबलो परब याबाबत अधिक तपास करीत आहेत.









