अॅङ महेश राणे यांनी अतिक्रमण विरोधात पालिका संचालनालयात दिले होते आव्हान
म्हापसा : गेल्या आठ दिवसापासून म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा भोवताल परिसरात चाललेली अतिक्रमण मोहीम बेकायदेशीररित्या होत असून या मोहिमेंतर्गत उचलण्यात येणाऱ्या सामानाची योग्यरित्या नोंद घेतली जात नाही. पालिकेने या कारवाईअंतर्गत किती सामान जप्त केले, ते कुणाचे आहे याचा पालिकेकडे काहीच तपशील नाही. सामानाची मोडतोड करीत ट्रकने उचलून ते पालिकेच्या गोदामात टाकले आहे. हा अधिकार मुख्याधिकाऱ्यांना नाही अले याचिका पत्रिकेत नमूद करून म्हापशातील प्रसिद्ध वकील अॅङ महेश राणे यांनी पालिका संचालनालयाच याचिका दाखल केली असता म्हापसा पालिकेने अतिक्रमण विरोधी राबविलेली मोहीम बेकायदा ठरवून ही मोहीम स्थगित ठेवण्याचा आदेश पालिका संचालनालयाने म्हापसा पालिकेला दिला आहे. अॅङ महेश राणे यांनी याविरोधात आव्हान दिले होते. गेल्या आठ दिवसापासून म्हापसा नगरपालिका अतिक्रमण विरोधात मोहीम राबवित आहे. पालिका मुख्याधिकाऱ्यांनी नियमाचे उल्लंघन केले आहे. जे काही कायद्यानुसार व्हायला पाहिजे होते ते करण्यात आले नाही. ही मोहीम हाती घेताना ज्या दुकानदाराचे सामान उचलताना त्याची नोंद करायला हवी होती ती करण्यात आली नाही. कुणाचेही सामान उचलून ते नेतेवेळी वा उचलताना त्याची मोडतोड करण्यात आली आहे. कायद्याने हे बेकायदेशीर आहे. सामानाची काहीच नोंदी नाही असे मुख्याधिकारी करू शकत नाही. आदी सूचना मांडून पाच पानी याचिका पालिका संचालनालयाकडे केली असता त्याची दखल घेत ही अतिक्रमण बेकायदेशीर असल्याचे ठरवित पालिका संचालकांनी या कारवाईस स्थगिती दिली आहे. दरम्यान येत्या 15 जून रोजी यावर सुनावणी होणार आहे.









