म्हाकवे प्रतिनिधी
सन 2021-22 मधील महाराष्ट्र राज्यस्तरिय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते. त्याचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये म्हाकवे इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज म्हाकवे शाळेच्या ‘ स्मार्ट- आय कार्ड ‘ या उपकरणाची राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे.बलात्कार आणि अपहरण रोखण्यासाठी व गुन्हेगारांना पकडण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार आहे. मोठे शहर असो की गाव अनेक ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत. अनेकदा कामाचे ठिकाण , शाळा , महाविद्यालय किंवा प्रवासात बिकट प्रसंग ओढवतो त्यावेळी एखादी महिला सक्षमपणे या प्रसंगाला तोंड देत समोरील व्यक्तीचा उद्देश हाणून पाडते.परंतु या प्रसंगी काही महिला गोंधळून जातात , नेमके काय करावे ते सुचत नाही . अशावेळी या स्मार्ट आय कार्ड या उपकरणाचा उपयोग करून गुन्हेगारची ओळख पटविण्यासाठी होतो.ज्यामुळे अत्याचार व अपहरणाच्या घटना रोखता येतात.
असे बनले स्मार्ट आयकार्ड
स्मार्ट आय कार्ड या उपकरणांमध्ये जीएसएम किट , सिम कार्ड , कॅमेरा ,एक छोटी बॅटरी आणि सर्किट बसविण्यात आले आहे. हे उपकरण म्हणजेच सामान्य आयकार्ड प्रमाणे गळ्यात अडकविता येते.
उपकरणाद्वारे असा रोखता येणार अत्याचार
संकट काळात संबंधित मुलीने या आयकार्डच्या खालच्या बाजूला असलेले एक बटन दाबल्यानंतर त्या सर्किटमध्ये सेव केलेल्या तिच्या घरच्या नंबर वर लगेचच एक मदतीचा मेसेज जातोआणि फोन लागतो.वायफाय कॅमेऱ्यातून घरच्या फोनवर त्या मुलीचा लाईव्ह व्हिडिओ देखील घरातील लोकांना पाहता येतो त्यामुळे संबंधित महिला , मुलगी कोठे आहे आणि तिच्यासोबत कोण आहे आणि काय घडत आहे हे लगेच समजते.त्याचपद्धतीने या आयकार्ड वरील दुसरे बटन दाबल्यावर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मदतीचा मेसेज जातो आणि फोन सुद्धा पोलिसांना जातो .त्याच बरोबर आय कार्ड मधील जीपीएस लोकेशन देखील पोलिसांना तात्काळ पाठवले जाते.त्यामुळे गुन्हेगारांना पकडणे सोयीचे होते.अशा समाज उपयोगी उपकरणाची निवड आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी झालेली आहे.शाळेच्या या उपकरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर उपकरणाचे सादरीकरण शाळेची विद्यार्थिनी कु.स्नेहल राजाराम गंगाधरे हिने केले तसेच मार्गदर्शन शाळेचे शिक्षक युवराज पाटील यांनी केले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग भारमल यांचे प्रोत्साहन लाभले.
आपण 21 व्या शतकाचे साक्षीदार होत असताना,अनेक क्षेत्रात प्रगतीच्या बाता मारत असतो.पण आज आपल्या समाजात मुली,महिला,लहान मुले किती सुरक्षित आहेत हा एक मोठा प्रश्न आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांच्या सर्वेक्षणातून ,निर्भया बलात्कार प्रकारणानंतरच्या गेल्या 7-8 वर्षात बलात्कार प्रकरणातील आरोपीना शिक्षा झाल्याची टक्केवारी केवळ 32.2 %आहे.हे शिक्षेचे प्रमाण कमी होण्याचे कारण ,सबळ पुरावा नसणे.याचसाठी आम्ही प्रत्यक्ष पुरावा हाती लागावा, महिला ,मुली,मुले,सुरक्षित राहावीत,बलात्कार,अपहरण,या घटना कमी व्हाव्यात या उद्देशाने आम्ही हे आय कार्ड बनविले आहे.फक्त बलात्कार करणाऱ्या अपराध्याला फाशी देऊन ही समस्या सुटणार नाही तर,अशाप्रकारे शेफ्टी आय कार्ड बनवून या घटनांवर आळा घालता यावा या उद्देशाने आम्ही कल्पना तयार केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









