पणजी : कर्नाटक राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या भाजपच्या प्रचारसभेतून म्हादईच्या पाण्याचा विषय खदखदत असून कळसा -भांडुरा प्रकल्पासाठी फक्त वनमंत्रालयाचा दाखला मिळणे बाकी असल्याचे सांगून तो मिळताच म्हादईचे पाणी वळवण्यासाठी त्या प्रकल्पाचे काम सुरू करण्याची दर्पोक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी चालवली आहे. म्हादईचे पाणी मलप्रभेत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. बोम्माई यांनी एका प्रचारसभेत बोलताना वरील दर्पोक्ती व दावा करुन सांगितले की, म्हादईवर बोलण्याचा काँग्रेस पक्षाला हक्क नाही. कारण त्या पक्षाच्या गोव्यातील जाहीर सभेत सोनिया गांधी यांनी कर्नाटकला म्हादईचा एक थेंबही मिळणार नाही, असे सांगितले. होते ते आम्ही विसरलेले नाही तत्कालीन डॉ. मनमोहनसिंग यांच्या केंद्रातील सरकारने म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्यास विरोध केला होता. तेव्हा आता काँग्रेसने या म्हादईवर बोलू नये. मुग गिळून गप्प बसावे असा सल्ला बोम्माई यांनी दिला आहे. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कर्नाटकातील भाजपच्या निवडणूक प्रचारसभेत सहभागी होत असल्याचे स्पष्ट झाले असून दक्षिण बेलभानगडी येथे त्यांनी विजय संकल्प यात्रेत भाग घेतला. त्यावेळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा उपस्थित होते. सदर यात्रा म्हणजे भाजपचे प्रचार सभेचे रणशिंग असून कर्नाटकची जनता 150 पेक्षा अधिक जागा भाजपला मिळवून देईल आणि भाजपचे बहुमताचे सरकार सत्तेवर येईल, अशी भूमिका डॉ. सावंत यांनी येथे मांडली आहे. कर्नाटकातील विकास पाहून लोक भाजपला मते देतील आणि भाजपच पुढे आणखी विकास कऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपच्या विजयासाठी त्यांनी जनतेला आवाहनही केले.
Previous Articleगोवा डेअरीतील गैरव्यवहार संचालक मंडळास शेकणार
Next Article ‘रंग धूम’च्या निमित्ताने खंडणीचे ‘सेटिंग’
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









