किंमत 9.99 लाख रुपये : पूर्ण चार्जवर 331 किमी धावणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एमजी मोटार इंडियाने भारतीय बाजारपेठेत पहिली क्रॉसओव्हर युटिलिटी व्हेईकल(सीयूव्ही) ‘विंडसर’ ईव्ही कार लाँच केली आहे. ईव्हीमध्ये 38 केडब्लूएच लिथियम आर्यन बॅटरी आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केली गाडी जवळपास 331 किमीपर्यंत धावणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे. कार 604 लीटर बूट स्पेस, 8.8-इंच डिजिटल क्लस्टर आणि वायरलेस चार्जिंग सुविधा देते. तसेच भातीय बाजारपेठेत ही कार तीन प्रकारात व चार रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. कंपनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून 3 ऑक्टोबरपासून बुकिंग सरु करणार आहे. तसेच डिलिव्हरी दसऱ्यापासून म्हणजे 13 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. विंडसरच्या ग्राहकांना पहिल्या एक वर्षासाठी एमजी ई हब वर मोफत पब्लिक चार्जिंग सुविधा मिळणार आहे. तसेच कार सेडान सारखी आरामदायी अनुभव देते. पॅनारोमिक रुफ, इन्फिनिटी व्ह्यू ग्लास रुफ आणि एरो लाउंज सीट सारखी फिचर्स मिळणार आहेत.