पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड हिस्स्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी उद्घाटन करणार आहेत. हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो मार्गादरम्यान भारतात कुठल्याही नदीखाली निर्माण करण्यात आलेले पहिले परिवहन भुयार आहे.
हुगळी नदीखाली निर्माण करण्यात आलेले हे भुयार कोलकाता आणि हावडा शहराला जोडणारे आहे. हावडा मेट्रो स्थानक भारतातील सर्वात खोलवर निर्माण करण्यात आलेले मेट्रो स्थानक देखील आहे. याच्या निर्मितीदरम्यान अनेक आव्हानांना सामोरे जावे लागल्याचे कोलकाता मेट्रोकडून म्हटले गेले आहे.
या मार्गावरून आता दररोज 7 लाख लोक प्रवास करतील अशी अपेक्षा असल्याचे कोलकाता मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक उदय कुमार रे•ाr यांनी सांगितले आहे. विस्तृत अध्ययनानंतरच हावडा मैदान-एस्प्लेनेड मार्ग निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य अनिल कुमार यांनी दिली आहे.









