बेंगळूर :
बस तिकीट दरात वाढ, करवाढ, पाणी पट्टीवाढीनंतर बेंगळूरवासियांना आणखी एक धक्का बसला आहे. बेंगळूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लि. (बीएमआरसीएल) ‘नम्म मेट्रो’ रेल्वे तिकीट दरात 46 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. रविवार 9 फेब्रुवारीपासूनच तिकीट दरवाढ जारी होत आहे. शनिवारी यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला. किमान 10 रुपये ते कमाल 90 रुपयांपर्यंत मेट्रो रेल्वे तिकीट दरवाढ करण्यात आली आहे. मागील आठ वर्षांपासून तिकीट दरवाढ झाली नव्हती. तिकीट दरवाढीसंबंधी नियुक्त समितीने सिंगापूर, हाँगकाँग व दिल्लीला भेट देऊन तिकीट दरवाढ प्रक्रियेचे अध्ययन करून अहवाल दिला आहे.
2 कि. मी. पर्यंत 10 रु., 2 ते 4 कि. मी. पर्यंत 2 ते 6 कि. मी. पर्यंत 30 रुपये, 6 ते 8 कि. मी. साठी 40 रु. अशा प्रकारे दरवाढ करण्यात आली आहे. पर्यंत 60 रु, 15 ते 20 कि. मी. पर्यंत 70 रु., 20 ते 25 कि मी. पर्यंत 80 रु. आणि 30 कि. मी. पर्यंत 9 रुपयांनी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. स्मार्टकार्डवर दिली जाणारी 5 रुपये सूट कायम ठेवण्यात आली आहे. स्मार्ट कार्डमध्ये किमान 50 रु. असणे आवश्यक होते. ही रक्कम आता 90 रु. करण्यात आली आहे.









