भविष्यात मिथेन उत्सर्जनातील वृद्धी अशीच सुरू राहिली तर हे ध्रूवीय क्षेत्रांमध्ये ओझोन थराच्या पुनर्स्थापनेला गंभीर स्वरुपात प्रभावित करू शकते. एका अध्ययनात मिथेन उत्सर्जन आणि ओझोन थर पुनर्स्थापनेमधील जटिल संबंधांना उघड करण्यात आले आहे. याचे निष्कर्ष अॅडव्हान्सेस इन अॅटमॉस्फेरिक सायन्सेस या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहेत.
ओझोन थर पृथ्वीवर राहणाऱ्या जीवांना हानिकारक किरणांपासून वाचविण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल यासारख्या जागतिक प्रयत्नांनी ओझोन-नाशक पदार्थांवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले आहे, परंतु हवामान बदल आणि मानवीय घडामोडींमुळे ओझोन थराची पुनर्स्थापना अद्याप अनिश्चित ठरलेली आहे.
बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अध्ययनात मिथेनच्या दुहेरी भूमिकेला अधोरेखित करण्यात आले आहे. मिथेन एक शक्तिशाली ग्रीनहाउस गॅस असून तो हवामान बदलाला प्रोत्साहन देतो. याचबरोबर हा वायुमंडळात विविध जटिल रासायनिक क्रियांमध्ये देखील भाग घेतो, जो ओझोन थराला प्रभावित करू शकतो. भविष्यात ओझोन रिकव्हरी आणि हवामान बदलाशी निगडित पूर्वानुमानांच्या अचूकतेसाठी या दुहेरी प्रभावांना समजून घेणे आवश्यक असल्याचे संशोधकांचे सांगणे आहे.
वाढते मिथेन उत्सर्जन धोकादायक
अध्ययनानुसार वाढते मिथेन उत्सर्जन अत्यंत धोकादायक आहे, कारण हे आर्क्टिक आणि अंटार्क्टिका क्षेत्रांमध्ये ओझोन थराच्या रिकव्हरीवर विशेष स्वरुपात गंभीर प्रभाव पाडू शकतो. ज्याप्रकारे जमिनीच्या स्तरावर ओझोन हानिकारक असतो, परंतु समताप मंडलात हा लाभदायक भूमिका पार पाडतो, त्याचप्रकारे मिथेन आणि अन्य संबंधित घटक देघील दुहेरी प्रभाव निर्माण करू शकतात. सखोल अध्ययन केल्याचे याचे जटिल स्वरुप समजून घेतले जाऊ शकते, यामुळे हवामान व्यवस्थापनासाठी प्रभावी रणनीति तयार करण्यास मदत मिळणार आहे.
भविष्यातील योजना
भविष्यात संशोधक ओझोन रिकव्हरीला प्रभावित करणाऱ्या अन्य घटकांनाही स्वत:च्या मॉडेलमध्ये सामील करण्याची योजना आखत आहेत. त्यांचा उद्देश ओझोन रिकव्हरीशी संबंधित संभाव्य हवामान आणि वायुमंडळीय प्रभावांना समजून घेत यामागील कारणे आणि त्यांच्या परिणामधील संबंध स्पष्ट करणे आहे. संशोधकांचे अंतिम लक्ष्य ओझोन रिकव्हरीच्या विविध पैलूंना व्यापक स्वरुपात समजून घेणे आणि या प्रक्रियेला प्रभावित करणाऱ्या घटकांची ओळख पटविणे आहे.









