कोल्हापूर :
या वर्षातील सर्वात मोठ्या उल्कावर्षांपैकी एक जेमिनिड्स उल्कावर्षाव शुक्रवार 13 डिसेंबर रोजी रात्री होणार आहे. यावर्षी चंद्रप्रकाशामुळे उल्कावर्षाव दिसण्यात थोडासा प्रभाव पडेल. तरीही प्रति तास सुमारे 120 उल्का दिसण्याची शक्यता आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अंतराळ संशोधन केंद्राने या खगोलीय नजाऱ्याचे खुले निरीक्षण सर्व नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासाठी रात्री 8 नंतर आयोजित केले आहे. पन्हाळ्यात प्रदूषण कमी असल्याने आकाश स्पष्ट दिसते. तरी सर्व नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी उल्कावर्षाव पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








