इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपसाठी उपयुक्त
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेतील ‘मेटा एआय’ कंपनीने भारतात ‘इमॅजिन मी’ हे सॉफ्टवेअर-फीचर लाँच केले आहे. या सॉफ्टवेअरचा उपयोग प्रतिमारचना (इमेजिंग) करण्यासाठी होणार असून ते इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप आदींच्या उपयोगकर्त्यांसाठी लाभदायक ठरणार आहे, असे या कंपनीकडून प्रतिपादन करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरचा उपयोग संदेश पाठविणाऱ्याची विशिष्ट प्रकारची प्रतिमा किंवा इमेज बनविण्यासाठी होणार आहे. ही प्रतिमा ज्या प्रकारचा संदेश असेल, त्याला अनुरुप अशी निर्माण करण्याची या सॉफ्टवेअरची क्षमता आहे. टेक्स्ट प्रॉम्पट्स् आणि सेटअप फोटोज यांच्यात प्रसंगानुरुप परिवर्तन करण्यासाठीही ते उपयुक्त आहे. या सॉफ्टवेअरला आपण जी आज्ञा कराल त्यानुसार तुमचे छायाचित्र परिवर्तीत होईल, अशी सोय या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आली आहे.
तुमच्या आज्ञेप्रमाणे प्रतिमाचित्रे
या सॉफ्टवेअरला ‘इमॅजिन मी अॅज ए 90ज रॉकस्टार’ (मला 90 च्या दशकातील रॉकस्टारचे स्वरुप दे) अशी आज्ञा केल्यास तुम्हाला तुमचे तसे प्रतिमाचित्र पहावयास मिळणार आहे. किंवा ‘इमॅजिन मी अॅज ए कॉमिक बुक हीरो’ अशी आज्ञा केल्यास तशा प्रकारे तुमचे प्रतिमाचित्र हे सॉफ्टवेअर बनविणार आहे. यामुळे तुम्ही पाठवित असलेल्या संदेशाला एक जिवंतपणा देण्याचे किंवा तो संदेश खुलविण्याचे काम हे सॉफ्टवेअर करू शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.
उपयोग कसा कराल
या सॉफ्टवेअरचा किंवा फीचरचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला प्रारंभी पर्सनल किंवा ग्रुप चॅटस्च्या माध्यमातून @शू Aघ् शी संवाद करावा लागणार आहे. त्यानंतर ‘इमॅजिन मी अॅज….अशी आज्ञा द्यावी लागणार आहे. जे प्रथम उपयोगकर्ते, अर्थात, फर्स्ट टाईन यूजर्स आहेत त्यांना आपली काही छायाचित्रे या सॉफ्टवेअरमध्ये पोस्ट करावी लागणार आहेत. तुमचे काल्पनिक प्रतिमाचित्र अचूकपणे बनण्यासाठी अशी छायाचित्रे पोस्ट करण्याची आवश्यकता आहे.
काही क्षणातच काम पूर्ण
आपण आज्ञा देताच हे सॉफ्टवेअर काही क्षणातच तुम्हाला हवे तसे तुमचे प्रतिमाचित्र बनवून ते डिस्प्ले करणार आहे. ही प्रतिमाचित्रे तुम्ही मेटा एआयच्या सेटपमध्ये जाऊन बदलू शकता, किंवा डीलाrट करू शकता. सॉफ्टवेअरने बनविलेल्या प्रतिमाचित्रात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा आवश्यकतेप्रमाणे सुधारणा किंवा परिवर्तन करु शकता. छायाचित्रांचे रीटेक करु शकता, किंवा हे फीचरच बंद करु शकता, अशा विविध सोयी उपयोगकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत.
अद्भूत ‘फीचर’
- आपल्या इच्छेप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे होणार आपल्या फोटोत परिवर्तन
- आपल्या संदेशाला अनुकूल असा इफेक्ट आणण्यासाठी फीचर उपयुक्त
- आपण आज्ञा दिल्यानंतर काही क्षणातच आपल्या दिसून येणार परिणाम









