सावंतवाडी प्रतिनिधी
जे गेले ते गेले अर्थात त्यांच्याकडे पाहायचं नाही. बस आता पक्ष उभारणी नव्या जोमाने करूया असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत भेटीवेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या जवळ स्पष्ट केले. श्री भोसले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्री पवार यांनी राज्यात रविवारी घडलं त्याचे पडसाद सिंधुदुर्गात काय आहेत तसेच सिंधुदुर्गातील परिस्थिती आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची माहिती घेतली. तुम्ही सर्वजण आहात चांगलं वाटलं असेच पक्षासोबत रहा , जे गेले ते जाऊ देत आपण पुन्हा जोमाने पक्ष उभारूया असे शरद पवार यांनी प्रवीण भोसले यांना सांगितले . यावेळी श्री भोसले यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली. श्री पाटील यांनी भोसले यांचे व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कौतुकही केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









