वृत्तसंस्था/ फोर्ट लॉडेरडेल (फ्लोरिडा)
येथे सुरू असलेल्या लीग चषक फुटबॉल स्पर्धेच्या शुक्रवारी रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंटर मियामीच्या चार्लोटीचा 4-0 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्यफेरी गाठली. या सामन्यात अर्जेंटिनाच्या लायोनेल मेसीने इंटर मियामीचे प्रतिनिधीत्व करताना 86 व्या मिनिटाला गोल केला. मेसीने अलिकडेच इंटर मियामी क्लबबरोबर करार केला होता. या क्लबकडून खेळताना त्याने आतापर्यंत 5 सामन्यात 8 गोल केले आहेत. सदर स्पर्धेत 47 संघांचा समावेश आहे. इंटर मियामीतर्फे या सामन्यात जोसेफ मार्टिनेज आणि रॉबर्ट थॉमस यांनी प्रत्येकी एक गोल केला. या सामन्याला मेसीचा खेळ पाहण्यासाठी 22 हजार शौकीन उपस्थित होते. इंटर मियामी संघाने चालू वर्षीच्या फुटबॉल हंगामात आतापर्यंत 22 पैकी 5 सामने जिंकले आहेत. इंटर मियामी संघाला आता या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यासाठी केवळ सामने जिंकणे जरूरीचे आहे.









