वृत्तसंस्था / फ्लोरीडा
येथे झालेल्या लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात इंटर मियामी संघाला टोरँटो एफसीने 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. या अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात इंटर मियामीतर्फे अर्जेंटिनाच्या लायोनेल मेस्सीने गोल नोंदविला.
इंटर मियामी संघात दाखल झाल्यानंतर मेस्सीचा हा विविध आंतरराष्ट्रीय लीग फुटबॉल स्पर्धेतील 40 वा गोल आहे. चालु वर्षीच्या फुटबॉल हंगामात प्रमुख लीग फुटबॉल सामन्यात मेस्सीचा हा तिसरा गोल आहे. टोरँटो एफसीतर्फे बिमेरडेशी एकमेव गोल नोंदविला. इंटर मियामीचा आता पुढील सामना येत्या रविवारी शिकागो फिरेशी होणार आहे.









