खानापूर- येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालताना माजी आमदार दिगंबर पाटील प्रकाश चव्हाण.
कर्नाटक सरकारचे बेळगांव येथे अधिवेशन होते.याला विरोध म्हणून मध्यवर्ती म.ए. समितीतर्फे बेळगाव येथील व्हक्सीन डेपोवर सोमवारी महामेळाच्या आयोजन करण्यात आले होते.परंतु महामेळावा होऊ नये म्हणून पोलिसांनी वॅ्हक्सिंन डेपो मध्ये जाणार्या सर्व प्रवेशद्वारावर थांबून मेळाव्याला जाणाऱ्यांना रोखले. तर काहींना अटक केली तर काहींना हाकलून घालण्याचा प्रकार घडला. त्यामुळे खानापूर तालुक्यातील म.ए. समिती नेत्यात व कार्यकर्त्यात मोठा असंतोष निर्माण झाला.मराठी भाषिकांची गळचेपी केली. या संतोषाची पुनरावृत्ती म्हणून खानापूर तालुक्यात महामेळाव्याला जाणाऱ्या शेकडो समिती नेते व कार्यकर्त्यांनी खानापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात येऊन घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार घातला.त्यानंतर कर्नाटक सरकारचा तसेच पोलिसांचा यावेळी निषेध करण्यात आला.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर,भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे अशा घोषणाही देऊन परिसर दणाणून सोडला.
निषेध सभा
खानापूर येथील शिवस्मारकात निषेध सभा घेण्यात आली.
यावेळी आपल्या संतप्त भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
याावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, यशवंत बिरजेे, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, मर्याप्पा पाटील, नारायण कापोलकर, डी.एम.भोसले, आबासाहेब दळवी, मारुती परमेकर, विठ्ठल गुरव, जयवंत पाटील, राजू लकेबैलकर, रवींद्र देसााई, रवींद्र शिंदे, तानाजी कदम, कृष्णा मन्नोळकर, प्रभाकर बिरजेे, ईश्वर बोभाटे, लक्ष्मण जांबोटकर, दीपक देसाई, कल्लाप्पा पाटील व इतर उपस्थित होते .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









