प्रतिनिधी / बेळगाव
दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना शहापूर परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी सकाळी या परिसरात पदयात्रा काढण्यात आली. त्या ठिकाणी विविध मंडळांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना भरभरून पाठिंबा जाहीर केला.
गुरुवारी सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून पदयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर महावीर कॉलनी, बोळमल गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, बिच्चू गल्ली, सराफ गल्ली, जोशी गल्ली, बसवाण गल्ली, पवार गल्ली, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, खासबाग, हरिजनवाडा, बसवेश्वर सर्कल, नाथ पै चौक येथे पदयात्रेची सांगता झाली.
पदयात्रेमध्ये म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी मंडळांनी रमाकांत कोंडुस्कर यांना पुष्पहार अर्पण करून जाहीर पाठिंबा व्यक्त केला. महिलांनीही त्यांना आरती ओवाळून औक्षण केले. शहापूर परिसर कोंडुस्कर यांच्या पूर्णपणे पाठीशी असून त्यांना निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला.
या रॅलीवेळी नेताजी जाधव, नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी उपमहापौर संजय शिंदे, राजू बिर्जे, दिलीप बैलूरकर, अमृत भाकोजी, आप्पाजी काकतकर, सूर्याजी बिर्जे, शिवराज पाटील, सुनील आचमनी, सागर पाटील, भरत नागराळे, शाम कुडुचकर, वसंत पाटील, प्रवीण पाटील, मधू पाटील, अर्जुन देमट्टी यांनी रमाकांत कोंडुस्कर यांचे स्वागत केले. नार्वेकर गल्ली श्री गणेशोत्सव मंडळ, मराठा मंडळ पंच मंडळ, श्री गणेशोत्सव मंडळ, वायुपुत्र सेना मंडळ, शिवयुवा संघटना यांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत परिश्रम घेऊन रमाकांत कोंडुस्कर यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.









