प्रतिनिधी / बेळगाव
मराठीतून परिपत्रके तसेच शहरातील फलक मराठीत लावण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने 27 जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.
अन् जिल्हाधिकारी भडकले
जिल्हाधिकाऱ्यांची म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने परवानगी घेतली होती. त्यानुसार ते सोमवारी सकाळी 11 वाजता दाखल झाले. मात्र ते बाहेरच बाकड्यावर बसले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आपल्या पी.ए.ला यापुढे भेटीसाठी परवानगी घेतलेल्या म. ए.समिती किंवा इतर नेतेमंडळी आली तर त्यांना गेस्ट रूम मध्ये बसून घ्यावे असे सुनावले.