बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांची पदयात्रा शहापूर भागामध्ये काढण्यात आली.
गुरुवार दि. २७ रोजी छत्रपती शिवाजी उद्यान येथून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांची पदयात्रा सुरु झाली. उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. यंदाच्या निवडणुकीत आपले बहुमोल मत देऊन आपणास बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना औक्षण करून पुष्पवृष्टी केले गेले तसेच रस्त्यावर फटाके फोडून जल्लोषी स्वागत करण्यात आले.
ही प्रचारफेरी बोळमळ गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, बिच्चू गल्ली, सराफ गल्ली, जोशी गल्ली, बसवाण गल्ली, पवार गल्ली, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड मार्गे बॅ . नाथ पै सर्कल येथे पोहचुन सांगता झाली.
याप्रसंगी मोठ्यासंख्येने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.










