वृत्तसंस्था/ अॅमस्टरडॅम
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या लिबिमा महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेल्जियमच्या एलीस मर्टेन्सने एकेरीची अंतिम फेरी गाठताना अॅलेक्सेंड्रोव्हाचा पराभव केला.
ग्रासकोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात मर्टेन्सने अॅलेक्सेंड्रोव्हाचा 2-6, 7-6 (7-5), 6-4 असा पराभव केला. या सामन्यात मर्टेन्सने 11 मॅच पॉईंटस् वाचवित विजय मिळविला. आता मर्टेन्स आणि रुमानियाची इलेना गॅब्रिएला रुसे यांच्यात अंतिम सामना होईल.









