मालवण / प्रतिनिधी
आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन कोल्हापूर या संस्थेमार्फत देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२३ जि. प . पूर्ण प्रा . शाळा मांडकुली नं. १ ता . कुडाळ चे पदवीधर शिक्षक श्री. सुयोग मारुती धामापूरकर यांना नुकताच सांगली येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सुकळवाड., ता मालवण गावचे सुपुत्र श्री सुयोग मारुती धामापूरकर यांनी सुमारे २३ वर्षे शिक्षक म्हणून आपली सेवा बजावली . विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.
शैक्षणिक ,सांस्कृतिक ,सामाजिक, क्रिडा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आपली शाळा प्रगतीपथावर येण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. अनेक विद्यार्थांना स्पर्धा परिक्षांमध्ये मार्गदर्शन करून यश संपादन करून दिले आहे . अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्रिडा प्रकारात पदके मिळवलेली आहेत. अशा उपक्रमशील शिक्षकाचा या संस्थेमार्फत राज्यस्तरिय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२३ देवून सन्मान करण्यात आला आहे . यावेळी व्यासपिठावर मा. प्रा . किसनराव कुराडे पाटील , मा श्री संजय पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.









