आचरा प्रतिनिधी
आचरा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाकडून शुक्रवार दि. 30 जून रोजी दुपारनंतर ठीक ४ वाजता न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे होणाऱ्या संघाच्या मासिक सभेत मार्च 2023 मध्ये झालेल्या १० वी व इयत्ता १२ वीच्या परिक्षेत आचरा केंद्रात पहिल्या तीन क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या तसेच इ.१० वी च्या परिक्षेत मराठी, इंग्रजी, विज्ञान, गणित ‘या विषयात केंद्रात पहिल्या आलेल्या तर इ. १२ वी च्या कला व वाणिज्य या दोन्ही शाखांत मराठी व इंग्रजी या विषयात केंद्रात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रकमेची बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.संबंधित विद्यार्थ्यांना संघाकडून पत्रे पाठविली आहेत. विद्यार्थी बाहेर गावी गेले असतिल तर त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून बक्षिसाचा स्विकार करावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा (पंचकोसी) च्या कार्यकारिणी कडून केले आहे. त्याप्रमाणे संघाच्या सभासदांनी या सभेला मोठ्या संखेने उपस्थि राहावे, असे आवाहन केलेआहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









