ओटवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा उपक्रम
ओटवणे प्रतिनिधी
ओटवणे पंचक्रोशी कार्यक्षेत्र असलेल्या ओटवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्यावतीने ओटवणे पंचक्रोशीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील तिन्ही हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ओटवणे सोसायटी चेअरमन आत्माराम गावकर, उपाध्यक्ष स्वप्नील उपरकर, संचालक प्रकाश दळवी, पांडूरंग तळवडेकर, बाळकृष्ण दळवी, रविंद्र म्हापसेकर, प्रदीप दळवी, श्रुती गावकर, भाग्यलक्ष्मी गावडे, गुंडू जाधव, शशिकांत गोसावी, आनंद मयेकर, संतोष सावंत, गटसचिव अश्विनी तावडे, कर्मचारी लुमा जाधव, मानसी नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी ओटवणे रवळनाथ विद्यामंदिर मधील प्रथम तीन क्रमांक करिश्मा मिलिंद राणे, रेश्मा चंद्रकांत नाईक, सानिका विश्वनाथ भिसे, विलवडे राजा शिवाजी विद्यालय मधील प्रथम तीन क्रमांक सानिका सोनू दळवी, सानिया लक्ष्मण दळवी, अनुजा विनायक दळवी, असनिये श्री शिवछत्रपती विद्यालय मधील प्रथम तीन क्रमांक नेहा गावडे, हर्षला हेमंत सावंत, प्रतिक्षा सावंत यांना तसेच इतर परीक्षांमधून विशेष प्राविण्य मिळविलेल्या तन्वी गावकर व तन्मय गावकर या विद्यार्थांना गौरविण्यात आले.यावेळी ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, कोनशी, नांगरतास, तांबुळी, असनिये, घारपी, दाभिल या गावातील संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.









