प्राचार्य बी. एल. मजुकर यांची उपस्थिती
बेळगाव : बाबुराव ठाकुर पदवीपूर्व कॉलेज, जांबोटी येथे द्वितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून जीएसएस कॉलेजचे प्राचार्य बी. एल. मजुकर उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, कन्याकुमारी ते गुजरातच्या तापी नदीपर्यंत विस्तारलेल्या पश्चिम घाटातील जैवविविधता ही अतिशय समृद्ध आहे. त्यांचे जतन हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. याप्रसंगी ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी तळवार, उपाध्यक्ष सुनील देसाई तसेच जयराम देसाई, मिलिंद डांगे, प्राचार्या पूजा पाटकर व प्राध्यापक उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. कृष्णा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली बेळगावकर यांनी केले. योगिता सुतार यांनी आभार मानले.









