सांगली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कै. बाबुराव ठाकुर यांनी बेळगाव जिल्ह्यात अनेक शाळा निर्माण केल्या. तसेच त्यांचे सुपुत्र किरण ठाकुर यांनीही खानापूर तालुक्यात महाविद्यालय सुरु केले. अनेक विद्यार्थ्यांना विना फी शिक्षण घेता आले. तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठीही अल्पदरात शैक्षणिक कर्ज देण्याचीही सोय ठाकुर यांनी केली. आर्मीतील भरतीसाठी लोकमान्य फिटनेस ट्रेनिंग अकॅडमी सुरु केली. त्यामुळे शहरासह अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांचीही चांगली सोय झाली, असे प्रतिपादन लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. चे संचालक गजानन धामणेकर यांनी केले.
खरे सांस्कृतिक केंद्र येथे लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. यांच्यावतीने आयोजित दहावीतील गुणवंत विद्याथ्र्यांच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी लोकमान्य सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुदत्त पाठक, तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री आदी उपस्थित होते. धामणेकर पुढे म्हणाले, पालकांनी मुलांना आवडेल त्या क्षेत्रात जाण्याची परवानगी द्यावी. सक्ती करु नये. मुलांनी आवडेल अशा स्पोर्टस, सायन्ससारख्या विविध क्षेत्रात जावे. त्यामध्ये अव्वल यश मिळवून, आई-वडीलांचे, गावाचे, तसेच देशाचेही नाव उज्ज्वल करावे, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सांगली परिसरातील विविध शाळेतील दहावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र व भेटवस्तू देवून कौतुक करण्यात आले. क्षेत्रीय व्यवस्थापक सुदत्त पाठक यांनी प्रास्ताविकात लोकमान्य सोसायटीच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. आभार प्रदीप पाटील यांनी मानले. सिटी हायस्कूलचे मुख्यध्यापक मुकुंद जोग यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे शाखाधिकारी सुभाष मोरे, प्रदीप पाटील यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








