न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कुलमध्ये यंदाच्या दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला . विद्यालयाच्या इयत्ता दहावीचा निकाल ९६. १५ टक्के लागला असून प्रथम क्रमांक काजल सुनिल मुळीक ९१.६० टक्के व्दितीय क्रमांक वैष्णवी ईश्वर थडके ८७.६० टक्के तृतीय क्रमांक विराज अनंत प्रभू साळगावकर ८७ टक्के यांनी मिळवला . या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर यशस्वी विद्यार्थ्यांनाही भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी आजगाव ग्रामपंचायतीमार्फत शाळेतील सर्व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी केले .
यावेळी शाळा समिती अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, माजी पंचायत समिती सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या मनीषा गोवेकर, ग्रामसेवक श्री गवस ग्रामपंचायत सदस्य राकेश सावंत, वर्षा रेवाडकर, शलाका वाडकर, वैष्णवी आजगावकर, तसेच अध्यापक विद्यालयाचे प्रा. गणेश तुंगार, प्रा. भरमण्णा वाणी, ग्रामस्थ चंदू पांढरे, दिपक गावडे,तसेच अन्य पालक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका मानसी परुळेकर यांनी केले तर आभार शकाव्या साळवी यांनी मानले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









