न्हावेली / वार्ताहर
मळगाव शालांत परीक्षा मार्च २०२३ मध्ये मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव चार निकाल यावर्षीही १००% असून या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेले सर्व विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक यांचा मळगाव हायस्कूलच्या चिंतन – हेमंत – शैलजा परब सभागृहात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.हा गौरव समारंभ माजी विद्यार्थी परिवार मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या मळगाव हायस्कूलच्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला.
व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष श्री शेखर पाडगावकर, प्रमुख पाहुणे श्री गणपत शिरोडकर, उपाध्यक्ष श्री प्रभाकर नागेश तेली, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री फाले सर व पर्यवेक्षक श्री कदम सर व श्री मनोहर राऊळ उपस्थित होते.या कार्यक्रमात शालांत परीक्षेत ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या मुलांना गुलाब पुष्प व डिक्शनरी देऊन आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पेन भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
माजी विद्यार्थी परिवाराच्या वतीने अध्यक्ष श्री शेखर पाडगावकर यांनी या प्रसंगी प्रशालेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तेली सर यांनी केले तर श्रीमती श्रद्धा सावंत -राणे मॅडम यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला मळगाव हायस्कूलचे शिक्षक, माजी विद्यार्थी व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









