समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा सन्मान
ओटवणे प्रतिनिधी
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज (मुंबई) सिंधुदुर्ग जिल्हा विभागाचा समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.या गुणगौरव सोहळ्याच्या व्यासपीठावर क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाजाचे मुंबई मध्यवर्ती उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर, मध्यवर्ती सदस्य तथा जेष्ठ पत्रकार विजय गांवकर, सिंधुदुर्ग अध्यक्ष सुर्यकांत घाडी, सचिव प्रदीप घाडी, सहसचिव बुधाजी घाडीगांवकर, खजिनदार सुनिल गांवकर, सदस्य विलास गांवकर, कैलास घाडीगांवकर, अशोक घाडी, सत्यवान घाडीगांवकर, दत्तगुरु गांवकर, कळसुलकर गुरुजी, भिसाजी घाडी, मध्यमुंबई माजी अध्यक्ष सदानंद घाडीगांवकर, भांडुप उपाध्यक्ष सुरेश गांवकर, आडेलकर गुरुजी, उत्तम गांवकर, कृष्णा घाडीगांवकर, सुभाष गांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या गुणगौरव सोहळ्यात घाडीगावकर समाजातील ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ७५ %पेक्षा अधिक आणि इयत्ता १२ वी परीक्षेत ६० % पेक्षा अधिक गुण मिळाले त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ५ वी व ८ वी स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी, नवोदय निवड यादीतील विद्यार्थी, इंजिनिअरिंग, मेडिकल, बी. फार्मसी पास विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गाडीगावकर समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करीत उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.









