वारणानगर, प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान ९ ऑगस्ट पासून संपूर्ण देशभरात राबवलं जात आहे कोडोली ता.पन्हाळा ग्रामपंचायतीच्या वतीने या अभियानाचा शुभारंभ अमृतकलशाचे पूजन करून आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.’मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानाला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व तालुक्यातून माती गोळा केली जाणार असून, ही माती एकत्रित करत एका कलशातून दिल्लीच्या कर्तव्य पथावर नेली जाणार आहे.तेथे प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या मातीतून ‘अमृतवाटिका’ बाग तयार केली जाणार आहे.यासाठी ग्रामीण भागातून आणलेली माती आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते या अमृतकलशात सन्मानपूर्वक टाकण्यात आली.
भारतातील विविध राज्यांमधून ७५०० कलशांतून माती आणली जाणार आहे.या मातीचा उपयोग दिल्लीच्या कर्तव्य मार्गावरील अमृत वाटिका विकसित करण्यासाठी केला जाणार आहे.या शिवाय दिल्लीत शिलाफलक बसवण्यात येणार आहे.त्यावर देशातील शहीद जवानांची नावे कोरली जाणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे यांनी सांगितले.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,उपसरपंच प्रविण जाधव,माजी सरपंच नितीन कापरे,माजी उपसरपंच मानसिंग पाटील,माणिक मोरे,प्रकाश पाटील,संदिप पाटील,प्रशांत जमणे,रणजित पाटील,,बाजीराव केकरे,अविनाश महापूरे,माधव पाटील,प्रकाश हराळे,सुरेश झेंडे ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.