वार्ताहर /हरमल
केंद्र सरकारने आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘वीरो को याद’ करण्यासाठी प्रत्येक पंचायत क्षेत्रांत करावयाच्या ’मेरी माटी, मेरा देश’ कार्यक्रम पंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच बर्नार्ड फर्नांडिस, उपसरपंच दिव्या देऊ गडेकर, पंच अनुपमा मयेकर, सोनाली माज्जी, सुशांत गावडे व भिकाजी नाईक तसेच पंचायत कर्मचारी गणपत नाईक, गजानन नाईक, प्रमोद गावडे, ऍलिसिया डिसौझा, तृप्ती शेटकर, गोपाळ खवणेकर, पेलेस्टिन डिसौझा तसेच पंचायत सचिव सुभाष कांबळी उपस्थित होते. यावेळी गटविकास कार्यालयात नेण्यासाठीचा कलश सरपंच बर्नार्ड फर्नांडिस व पंच सदस्यांनी सुपूर्द केला. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे उचित ठरेल तसेच गावच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच फर्नांडिस यांनी केले. यावेळी सचिव सुभाष कांबळी यांनी सरकारी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. शेवटी त्यांनी आभार मानले.









