चित्रपटाचा ट्रेलर सादर
अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह लवकरच रोमँटिक कॉमेडी ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटात दिसून येतील. निर्मात्यांनी याचा ट्रेलर सादर केला असून यात त्याची खास झलक दिसून येते. अर्जुन कपूर अलिकडेच सिंघम अगेन या चित्रपटात दिसून आला होता. आता तो एका कॉमेडी धाटणीच्या चित्रपटात दिसून येणार आहे.
या चित्रपटात ‘लव्ह ट्राइएंगल नहीं, सर्कल है’ असा संवाद असून अर्जुन कपूर, भूमी आणि रकुल यात अडकल्याचे दाखविण्यात आले आहे. चित्रपटात हर्ष गुजराल आणि शक्ती कपूर हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
भूमी आणि रकुलने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. रकुल याचबरोबर ‘दे दे प्यार दे 2’ या चित्रपटात दिसून येणार आहे. तर भूमी वेबसीरिज ‘दलदल’मध्ये मुख्य भूमिका साकारत असून यात ती पोलीस अधिकारी म्हणून दिसून येणार आहे. ही वेब सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.









