Ratnagiri : तिघांच्या टोळीने एका व्यवसायिकाला बोलण्यात गुंतवून ठेवत तेली आळी येथून आठवडा बाजार येथे घेऊन जात लुटले. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. व्यावसायिकाकडील १ लाख ९२ हजाराच्या सोन्याच्या ऐवज लंपास करण्यात आला आहे. रात्री उशिरा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
तक्रारदार यांचे रत्नागिरी शहरातील तेली आळी येथे टेलरिंगचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास दुकान उघडण्यासाठी ते आले होते. यावेळी तेली आळी येथे एकजण त्यांना भेटले. त्यांनी त्यांना बोलण्यातून गुंतवून ठेवत आठवडा बाजार येथे नेले. त्यांची माहिती घेत असताना जास्त पैसे, दागिने जवळ ठेवू नका, असे सांगत त्यांच्याकडील दागिन्यांची माहिती घेतली. तिघांच्या बोलण्याने प्रभावित झालेल्या टेलरने सुमारे अंगावरील १ लाख ९२ हजारांचे दागिने त्या तिघांकडे दिले. त्यानंतर काही क्षणात हे तिघेही घटनास्थळावरुन गायब झाले.
१५ मिनिटांनंतर तक्रारदार यांना आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Previous Articleपंतप्रधानांच्या जीवन प्रवासावरील चित्रपदर्शन
Next Article मोदी, सावंतांचे हात बळकट करा









