मुंबई :
मर्सिडीझ बेंझ इंडिया यांची नवी जी वॅगन ही इलेक्ट्रीक कार पुढील वर्षी भारतात लाँच केली जाणार आहे. सदरची गाडी 9 जानेवारीला सादर केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. सदरच्या गाडीची किंमत कितपत असणार आहे याचा खुलासा मात्र कंपनीकडून करण्यात आलेला नाही.
2024 च्या भारत मोबिलीटी शोमध्ये प्रथम ही गाडी प्रदर्शीत केली होती. या गाडीचे डिझाइन हे जी 450 डीसारखी आहे. ए पिलर डिझाइन आणि छत असून एक नवे स्पॉयलर लिप दिले असून यात नवे बोनेटही दिले गेले आहे. यात चार इलेक्ट्रीक मोटरचा पर्याय असेल. 147 एचपीची शक्ती सर्व मोटरना असून 2 स्पीड गिअरबॉक्स दिला जाणार आहे. ही गाडी 5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास असा वेग घेईल. याचा सर्वाधिक वेग 180 किमी प्रति तास असा असेल. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर गाडी जवळपास 470 किमीचे अंतर पार करेल, असा दावा कंपनीचा आहे.









