Mental Disorder Problem : प्रत्येकाला स्वतःची प्रशंसा ऐकायला खूप आवडत असते. जगाने त्यांची स्तुती करावी असे अनेकांना वाटते. जे लोक चांगले काम करताता त्यांची स्तुती नेहमी केली जाते. याउलट चांगले काम करायला नको पण स्तुती हवीयं अशी इच्छा असणाऱ्या लोकांचीही कमी नाही. कोणी वाईट वागत असेल तर ते पाहून चिडचिड होणे, जोडीदाराशी भांडणे सुरु होणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे अशी लक्षणे एखाद्याच्या वागण्याशी जुळत असतील तर, त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. वास्तविक, स्वतःला श्रेष्ठ समजणे आणि वाईट ऐकून भांडणे हे मानसिक विकाराचे लक्षण आहे. याला वैद्यकीय भाषेत व्यक्तिमत्व विकार म्हणतात. यावर वेळीच उपचार न केल्यास परिणाम घातक ठरू शकतात. जाणून घेऊया या आजाराविषयी.
नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर (Narcissist Personality Disorder)
नार्सिसिझम ही एक मानसिक स्थिती आहे जी नार्सिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर (NPD) म्हणून ओळखली जाते. हा विकार अनेक व्यक्तिमत्व विकारांपैकी एक आहे. या आजाराने ग्रस्त असलेले लोक स्वतःला सर्वोत्तम समजतात. असे लोक स्वतःकडे जास्त लक्ष देतात. स्वत:चे कौतुक ऐकायला त्यांना आवडते. त्यांना सामान्य नातेसंबंध निर्माण करण्यात त्रास होऊ लागतो. असे लोक इतरांसाठी भावनिकही नसतात. फक्त स्वतःमध्ये मग्न राहणे हीच त्याची प्राथमिकता असते.
हा आजार अशा प्रकारे बळावतो
असे लोक इतरांना स्वतःसमोर लहान समजतात. वाईट घडले की ते तुटतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांना लहानपणापासूनच स्तुती ऐकण्याची सवय असते. अशा लोकांना या आजाराचा धोका वाढतो. अशा लोकांना एकाचवेळी नैराश्य आणि चिंता जाणवू लागतात.
असे उपचार करा
ध्यान करा
स्वतःच्या चांगल्या आणि वाईटाचे मूल्यांकन करा.
इतरांशी तुलना करणे थांबवा.
तुमच्यासारखा जगात एकच आहे असे समजू नका.
स्वतःची जास्त प्रशंसा करणे टाळा.
डॉक्टरांना भेटा आणि उपचार करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









