महत्त्वाकांक्षी लोकांनाही स्वातंत्र्य पसंत
जगात एकीकडे एकाकीपणा वाढू लागल्याने लोक तणावत आहेत, तर दुसरीकडे लोकांना एकटे राहू आवडू लागले आहे. एकटे राहण्याचा अर्थ एकाकी पडणे नव्हे. प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार केवळ अमेरिकेत सध्या 40 टक्के प्रौढ एकटे राहत आहेत. यातील निम्मे लोक डेटिंग किंवा कुठल्याही कॅज्युअल रिलेशनमध्ये अडकून पडू इच्छित नाहीत.
1990 मध्ये अमेरिकेत एकटय़ा राहणाऱया प्रौढांची संख्या 29 टक्के होती. तर घटस्फोटामुळे एकटे राहत असलेल्या 39 टक्के प्रौढांना या अध्ययनात सामील करण्यात आले नाही. युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमधील मानसशास्त्राचे प्राध्यापक ज्यॉफ मॅकडोनाल्ड यांनी स्वतःच्या संशोधनात 40 वर्षे वयानंतर पुरुषांमध्ये एकटे राहण्याची इच्छा बळावू लागत असल्याचे म्हटले आहे. एकटे राहिल्यानंतर अशा पुरुषांना अधिक आनंदी वाटत असते. वयाच्या 40 वर्षानंतर बहुतांश विवाहित पुरुष स्वतःचे मित्र गमावत जातात. एकटे राहणाऱया लोकांची मैत्री आणि आनंदाची पातळी वाढत जात असल्याचे संशोधकाने म्हटले आहे.

लोक जितके महत्त्वाकांक्षी असतात, तितकेच त्यांना एकटं राहायचे असते. विशेषकरून महिलांमध्ये ही प्रवृत्ती अधिक असते असे सोशल सायकोलॉजिस्ट बेला डेपॉलो यांनी सांगितले आहे. आम्ही एकटे राहणाऱया लोकांची कहाणी एकत्र करत आहेत, यातून एकटे राहण्याची प्रवृत्ती का वाढतेय हे जाणून घेत आहोत. आता विवाह हे कुटुंब निर्मितीसाठी अनिवार्य राहिलेले नाही तसेच आर्थिक स्थैर्यासाठी देखील विवाह आवश्यक मानला जात नसल्याचे मॅकडोनाल्ड यांचे म्हणणे आहे.
रोमँटिक संबंधांमध्ये राहणारे लोक एकटे राहणाऱया लोकांमध्ये अधिक चांगले जीवन जगतात असे आतापर्यंतच्या संशोधनात दिसून आले आहे. अशाप्रकारचे लोक अधिक आनंदी आणि स्वतःच्या जीवनाबद्दल संतुष्ट असतात. तर ज्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले नसते, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे एकटे राहणाऱया लोकांपेक्षा खराब असते असा अनेक संशोधनांमधून निष्कर्ष निघाला असल्याचे प्राध्यापक मॅकडोनाल्ड यांनी म्हटले आहे.
एकटे राहण्याचे कारण
2022 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार एकटे राहण्याचे सर्वात मोठे कारण स्वातंत्र्य आहे. एकटे राहिल्याने स्वतःला अधिक वेळ देता येतो असे लोकांचे मानणे असते. स्वतःचे लक्ष्य कुठल्याही प्रकारे लक्ष विचलित न होता गाठता येईल असे मानणे असते. एकटे राहणारे लोक स्वतःचे आईवडिल आणि भावंडांची अधिक मदत करू शकतात. एकटे राहणाऱया लोकांची सामाजिक कक्षाही मोठी असते असे संशोधनातून समोर आल्याचे जेरूसलेमच्या हिब्रू युनिव्हर्सिटीतील तज्ञ एलैकिम किसलेव्ह यांनी सांगितले आहे.









