बिबटय़ाने अनेकांची उडविली झोप : मात्र नेटकऱयांच्या कल्पनाशक्तीला दिले खाद्य : मिश्कील मिम्स् व्हायरल
प्रतिनिधी / बेळगाव
एक बिबटय़ा बेळगावात मानवी वसाहतीत आला आणि बेळगावकरांची भीतीने गाळण उडाली. तर वनखाते आणि पोलिसांची त्याने झोपच उडविली. बिबटय़ाने माध्यमांना बराच तपशील पुरविला तर नेटकऱयांना बरेच खाद्य पुरविले.

पहिल्या दिवशी बिबटय़ा दिसला आणि त्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर बिबटय़ासाठी शोधमोहीम सुरू झाली. वनखाते आणि पोलीस खात्याने बराच फौजफाटा दाखल केला. बिबटय़ाचे गांभीर्य तेव्हाही होते आणि आजही आहेच. मात्र पोलिसांना, वनविभागाला, रेसक्मयु ऑपरेशनमधील सर्वांना ज्या तऱहेने बिबटय़ाने चकवा आणि गुंगारा देण्याचे सत्र आरंभले आहे, त्याचा नेटकरी फायदा न घेते तरच नवल!
तसेही बेळगाव हे सर्वांचेच आवडते ठिकाण आहे. येथे आलेले अधिकारी निवृत्तीनंतर शक्मयतो येथे राहण्याचा विचार करून गुंतवणूक करतात. येथील हवामान, ताजा भाजीपाला याचे आकर्षण सर्वांनाच आहे. त्याला बिबटय़ा कसा अपवाद असेल. त्यामुळे आता बेळगावातच मुक्काम करुया म्हणतो, असे म्हणत हेच माझं गाव, हेच माझं जंगल आणि मी या जंगलाचा जयकांत शिखरे अशा आशयाचे मिम्स् फिरत आहेत. अत्यंत गंभीर चेहरा करून ‘कधी जातात गा हे लोक’ असे बिबटय़ा म्हणत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बेळगावची भाषा ही संमिश्र भाषा आहे. अर्थातच ग्रामीण बोलीमध्ये ‘मीया काय आतंकवादी हाव? इतके जण आलेत माज पकडूस, पोलीस, वनाधिकारी, हत्ती काय काय हे, काय बनवून ठेवलय मला, असे बिबटय़ाचे कल्पनीक मनोगतही नेटकऱयांनी केले आहे. त्यापुढेच अरे आता हे काय आधी अधिकारी मग मुधोळ हौंड आणि आता काय थेट हत्ती? अशा प्रश्नार्थक चेहऱयाचा बिबटय़ाही नेटकऱयांनी तयार केला आहे. अत्यंत विचारमग्न बिबटय़ाची विचारमुद्रा दाखवत एक प्राणी पकडायला दोन प्राणी आणलेत, अशी खिल्ली उडविणारा बिबटय़ाही दिसतो आहे.
ड्रोन कॅमेरा, प्रचंड फौजफाटा यांच्या समोरून गुंगारा देत गेलेल्या बिबटय़ाच्या चित्रासमोर कसा पचका झाला तुमचा? असेही मिम्स् तयार झाले आहेत. ‘समोरूनच पळून गेलो तरीबी गावोस नाव’ असे मिश्कील मिम्स मनोरंजन करत आहेत. एकूणच बिबटय़ाने अनेकांची झोप उडविली तरी नेटकऱयांच्या कल्पनाशक्तीला मात्र खाद्य दिले आहे.
काय तो बिबटय़ा… एकदम बेस्ट
बेळगाव की हवा-पाणी बहोत अच्छी है, फॅमिलीके साथ शिफ्ट होणे का सोच रहा हूं’ हा मिम्स् लोकप्रिय होत आहे. याशिवाय काय तो बिबटय़ा, काय ते फॉरेस्ट खातं, एकदम बेस्ट अशा आशयाची कविता व्हायरल झाली असून ‘काय ते फॉरेस्ट, नको आता रेस्ट, हाय तुमची टेस्ट, न्हाय तर सारं वेस्ट, पकडू शकलात बिबटय़ाला तरच तुम्ही बेस्ट, असा या कवितेचा समारोप करण्यात आला आहे.









