डाॅ नानासाहेब प्रतिष्ठान रेवदंडा (अलिबाग) ,श्रीसमर्थ बैठक बांदा ,सावंतवाडी, तळवडे या श्रीसदस्यांच्या श्रीसेवेतुन बांदा येथील स्मशानभूमी परिसरातील स्वच्छता करण्यात आली . गेल्या पाच वर्षा पुर्वी दोनशे पन्नास वृक्ष लागवड करुन त्या वृक्षांचे संवर्धनही उत्तमप्रकारे केले जात आहे. त्या वृक्षाची नियमित पणे मशागत व जोपासना करुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व प्रत्येक मनुष्याला उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठीही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. स्मशानभूमीतील सर्व परिसर उत्तम प्रकारे साफ करुन वृक्षाना कमपाउंड करण्यात आले. या श्रीसेवेसाठी बांदा ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, डेगवे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उप विभाग प्रमुख विजय देसाई , डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर हे श्रीसदस्य ही उपस्थित होते. ही श्रीसेवा सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









