Mehbooba Mufti : गुजरातमधील सुरत येथील सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर विरोधकांनी सत्ताधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, कायदे आणि तपास यंत्रणांचा एका पक्षाच्या वर्चस्वासाठी गैरवापर केला जात आहे, असा आरोप पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करत केला आहे.
भाजप विरोधकांचा सर्वात प्रमुख चेहरा आणि कोणत्याही आणि सर्व प्रकारच्या टीकेला गुन्हेगार ठरवून भाजप राष्ट्र स्थापनेची त्यांची खरी योजना प्रकट करतंय. भारतील लोकशाहीचा ऱ्हास केला जात आहे. एका पक्षाच्या वर्चस्वासाठी कायदे आणि यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे.आपली शेवटची आशा न्यायव्यवस्थेवर आहे. दु:खद गोष्ट म्हणजे न्यायाला उशीर कसा होतो आणि निवडकपणे शिक्षा कशी दिली जाते हे आपण पाहत आहोत. न्यायालये कलम 370, बिल्किस बानो आणि CAA वर पाय खेचतात परंतु कथित ‘मानहानी’ च्या क्षुल्लक केसेस फास्ट ट्रॅक करतात, याच दु:ख वाटतं.
भाजपच्या आपत्तीजनक एकतर्फी निर्णयांचा फटका जम्मू आणि काश्मीरला पहिल्यांदाच बसला. आज ती आग भारतभर धुमसत आहे आणि या आगीत होरपळण्याचा धोका आहे. आशा आहे की या देशातील लोक परिस्थितीचे गांभीर्य वेळीच समजून घेतील, असे ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









