वृत्तसंस्था/ सुरत
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरु असलेल्या सामन्यात मेघालयाचा धडाकेबाज फलंदाज आकाशकुमार चौधरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवा विक्रम नोंदविला आहे.
रणजी फ्लेट विभागातील अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात मेघालयने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेघालयने आपला पहिला डाव 6 बाद 628 धावांवर घोषित केला. मेघालय संघातील आकाशकुमार चौधरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडविला. त्याने मेघालयाच्या पहिल्या डावातील 126 व्या षटकात अरुणाचल प्रदेशचा फिरकी गोलंदाज लिमान दाबीच्या गोलंदाजीवर आकाशकुमार चौधरीने सलग सहा षटकार ठोकले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आकाशकुमार चौधरीने केवळ 9 मिनिटात अर्धशतक झळकविण्याचा पराक्रम केला आहे. 25 वर्षीय आकाशकुमारला या षटकात पहिल्या चेंडूवर धाव घेता आली नाही. त्यानंतर त्याने आणखी दोन एकेरी धावा मिळविल्या. यानंतर त्याने सलग 6 षटकार खेचण्याचा विक्रम केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आकाशने 13 चेंडूत अर्धशतक झळकाविले. त्याचा हा 31 वा प्रथम श्रेणी सामना आहे. 2019 साली त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले. आकाशने 14 चेंडूत 8 षटकारांसह नाबाद 50 धावा झळकाविल्या. अर्पित भाटेवारने 273 चेंडूत 25 चौकार आणि 4 षटकारांसह 207 धावा कर्णधार किशन लिंगडोहने 187 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारांसह 119, राहुल दलालने 102 चेंडूत 9 षटकार आणि 12 चौकारांसह 144 धावा झोडपल्या.









