वृत्तसंस्था/ जयपूर
विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब गटातील येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विदर्भ संघाने मेघालयचा 32 धावांनी पराभव केला. या सामन्यात विदर्भतर्फे दर्शन नलकांडे आणि करुण नायर यांची कामगिरी चमकदार झाली.
मेघालयने नाणेफेक जिंकून विदर्भला प्रथम फलंदाजी दिली. विदर्भने 50 षटकात 9 बाद 243 धावा जमविल्या. विदर्भच्या डावात करुण नायरने 67, अक्षय वाडकरने 36, अथर्व तायडेने 35, हर्ष दुबेने नाबाद 20 तर दर्शन नलकांडेने 20 धावा केल्या. मेघालयतर्फे दिपूने 4 तर आकाशकुमारने 2 गडी बाद केले. त्यानंतर मेघालयचा डाव 48.1 षटकात 211 धावात आटोपला. किशनने 57, स्वरजीत दासने 44, नकुल वर्माने 34 तर विश्वाने 24 धावा केल्या. विदर्भतर्फे दर्शन नलकांडेने 3 तर अक्षय आणि गुरुबानी यांनी प्रत्येकी 2 तसेच तायडे व दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ 50 षटकात 9 बाद 243, मेघालय 48.1 षटकात सर्व बाद 211.









