वृत्तसंस्था/बेनडॉन (अमेरिका)
येथे झालेल्या 2025 च्या अमेरिकन महिलांच्या हौशी गोल्फ स्पर्धेचे अजिंक्यपद भारतीय वंशाची पण अमेरिकेत स्थायिक असणारी गोल्फपटू मेघा गन्नेने पटकाविले. तिने या स्पर्धेत ब्रुकी बिरमनचा पराभव केला. अमेरिकन महिलांच्या हौशी गोल्फ स्पर्धेत मेघा गन्नेची कामगिरी दर्जेदार झाली. 21 वर्षीय मेघाचे वडील हरी गन्ने तसेच आई सुधा गन्ने यांनी अमेरिकेत वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन महिलांच्या गोल्फ स्पर्धेत मेघाने पहिल्या फेरीपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेतली. या स्पर्धेमध्ये भारतीय वंशाच्या अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेमध्ये भारतीय वंशाच्या अक्षा भाटीयाने संयुक्त सहावे स्थान तर अॅरोन रायने संयुक्त 22 वे स्थान मिळविले.









