कोयना एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या रद्द
तरुणभारत ऑनलाईन
मिरज – पुणे रेल्वेमार्गावर दुहेरीकरणाच्या कामासाठी राजेवाडी – जेजुरी – दौंड या मार्गावर गुरुवारी (दि. २८) मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने कोयना एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या कुर्डूवाडी – मिरजमार्गे वळविण्यात आल्या आहेत.तसेच मुंबई – कोल्हापूर – मुंबई कोयना एक्स्प्रेस गुरुवारी (दि. २८) रद्द करण्यात आली आहे. पुणे – सातारा- पुणे, पुणे – फलटण -पुणे, लोणंद – फलटण – लोणंद पॅसेंजर रविवारपर्यंत (दि. ३१) रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर – पुणे एक्स्प्रेस सातारापर्यंत धावणार असून, सातारा ते पुणेदरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
हजरत निजामुद्दीन – यशवंतपूर एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन वास्को गोवा एक्स्प्रेस दौड- कुर्डूवाडी- मिरजमार्गे धावणार आहेत. बंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस मिरज – कुर्डूवाडी – दौंड -पुणेमार्गे धावेल. या सर्व रेल्वेगाड्या सांगली, कराड, सातारा स्थानकात जाणार नाहीत.









