खेड :
कोकण रेल्वे मार्गावरील पदुबिद्री रेल्वेस्थानकातील पॉईट क्रमांक 103 आणि 116 बदलण्याचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात आले आहे. यामुळे 31 मार्चपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 4 दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे मडगाव ते मंगळूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार आहे.
शुक्रवारी मडगाव–मंगळूर मेमू एक्सप्रेस मडगाव ते इन्नाजे दरम्यान 50 मिनिटांसाठी तर 20646 क्रमांकाची मंगळूर–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ठोकूर ते नंदीकूर विभागादरम्यान 20 मिनिटांसाठी थांबवण्यात आली. 29 मार्च रोजी 10107 क्रमांकाची मडगाव–मंगळूर मेमू एक्सप्रेस मडगाव ते इन्नाजे दरम्यान 50 मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. 20646 क्रमांकाची मंगळूर–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ठोकूर ते नंदीकूर दरम्यान 20 मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
30 मार्च रोजी 20646 क्रमांकाची मंगळूर–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ठोकूर ते नंदीकूर दरम्यान 20 मिनिटे थांबवण्यात येईल. 31 मार्च रोजी 10107 क्रमांकाची मडगाव–मंगळूर मेमू एक्सप्रेस मडगाव ते इन्नाजे दरम्यान 50 मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. 20646 क्रमांकाची मंगळूर–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ठोकूर ते नंदीकूर दरम्यान 20 मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.
- कोकण रेल्वेगाड्या धावल्या नियोजित वेळेत
कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या शुक्रवारी निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. गेल्या दोन दिवसांपासून रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत रवाना होत असल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकत आहेत.








