प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जांबोटीत बैठक : रास्ता रोको आंदोलनाचा विचार : रस्त्यावर दलदल-खाड्यांमुळे वाहनधारकांना धोका, त्वरित दुरुस्तीची गरज
वार्ताहर /कणकुंबी
बेळगाव-चार्ला-गोवा रस्त्याच्या दुऊस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ठोस निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. रास्तारोको आंदोलन हाच आता पर्याय आहे, याबद्दल चर्चा करण्यासाठी जांबोटी भागातील कार्यकर्त्यांच्या उद्या बुधवार दि. 30 रोजी जांबोटी येथे बैठकीचे आयोजन केले आहे. 2017-18 पासून चोर्ला रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. तेंव्हापासून रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याकडे प्रशासनाने दुर्लक्षच केले. मध्यंतरीच्या काळात रस्त्याची वाताहत झाली. प्रशासन झोपी गेले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांनी काही ठिकाणचे खड्डे श्र्रमदानाने बुजवून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला. विशेषत: कुसमळी, जांबोटी, कालमणी, चोर्ला गावातील सामाजिक कार्यकर्त्यानी यापूर्वी अनेकवेळा हा उपक्रम राबविला आहे. परंतु हे किती दिवस चालणार आहे, असा प्रश्न नागरिकांतून होत आहे. आज ना उद्या रस्ता दुऊस्तीचे काम हाती घेण्यात येईल म्हणून नागरिकांनीही प्रशासनावर दबाव आणला नाही. सामाजिक कार्यकर्ते किरण गावडे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदाराला रस्त्यासंदर्भात वेळोवेळी रस्त्याच्या बाबतीत संपर्क साधून रस्ता दुऊस्त करण्याची मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्षच करण्यात आले.
मागीलवषी राष्ट्रीय मार्ग महामार्ग प्राधिकरणाने बेळगाव ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या दुऊस्तीसाठी 275 कोटी ऊपयांचा निधी मंजूर करून देखील कंत्राटदाराने दहा टक्केही काम केले नाही. त्यामुळे पुन्हा रस्त्याची अवस्था ये रे माझ्या मागल्याच अशी झाली. प्रशासन व कंत्राटदाराला वेळोवेळी सांगून देखील रस्त्याच्या दुऊस्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. याचा निषेध करण्यासाठी व प्रशासनाला जागे करण्यासाठी आता रास्तारोको आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. रास्तारोको आंदोलना संदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला बेळगाव जिल्हा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे, जांबोटीचे जि.पं. माजी सदस्य जयराम देसाई, आमटेचे लक्ष्मण कसार्लेकर, पारवाडचे संजय पाटील, ग्रा. पं.अध्यक्ष भिकाजी गावडे, जांबोटीचे अण्णासाहेब कुडतुरकर, गोल्याळीचे पुंडलिक पाटील, संतोष कदम, अनंत गावडे तसेच जांबोटी-कणकुंबी भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
बेळगाव-गोवा बससेवा कुचकामी
सध्या बेळगाव-चोर्ला-गोवा मार्गावर धावणाऱ्या बसेस बेळगाव रेल्वे स्टेशनवरून येत असल्या तरीदेखील जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिकांना विशेषत: महिलांना कुचकामी ठरत आहे. या बसमध्ये या भागातील नागरिकांना प्रवेश दिला जात नाही. महिला वर्गाला तिकीट काढून प्रवास करावा लागतो. नाहीतर बसमधून उतरवून घातले जाते. त्यामुळे बऱ्याचवेळा बसेस रिकामी येत असल्या तरीसुद्धा जांबोटी, कणकुंबी भागातील नागरिकांना कुचकामी ठरत आहेत. प्रवाशी रेल्वे स्टेशनच्या किंवा थर्ड गेट व इतर ठिकाणी थांबलेले असतील तर त्या ठिकाणी बसेस थांबवल्या जात नाहीत. या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, असे सांगून स्थानिक नागरिकांवर अन्याय केला जात आहे. जांबोटी, कणकुंबी भागातील अनेक लोक गोवा किंवा बेळगावला दररोज ये-जा करतात. परंतु स्थानिक बसेस केवळ सकाळ, संध्याकाळ या दोनच वेळेत असल्याने बेळगाव-गोवा बसवरच अवलंबून राहावे लागत आहे. तेंव्हा यासंदर्भात सुद्धा बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. जांबोटी, कणकुंबी भागातील नागरिकांनी जांबोटी येथे होणाऱ्या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन किरण गावडे यांनी केले आहे.
माती टाकून खड्डे बुजविले
जांबोटी-कणकुंबी-चोर्ला रस्त्यांपैकी काही धोकादायक असलेले खड्डे कंत्राटदाराने माती टाकून बुजवलेले आहेत. त्यामुळे त्या ख•dयांचा वाहनधारकांना पुन्हा धोकाच निर्माण झाला आहे. कणकुंबी भागात होणाऱ्या पावसामुळे चिखलमय झालेला असून दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. खडी टाकून खड्डे बुजवले असते तर वाहनधारकांना थोडाफार दिलासा मिळाला असता, परंतु कंत्राटदाराच्या बेफिकीरपणामुळे खडीऐवजी ख•dयात माती टाकण्यात आली आहे. त्याचा उपद्रव प्रवासी व वाहनधारकांना होत आहे. चिखले आणि कालमणी गावच्या जवळपास रस्त्यावरील खड्डे माती टाकून बुजविण्यात आले आहेत.









